• +91 –7768825005 | 91 - 9370772752

ब्रेकिंग न्यूज़

work

प्रिय बंधू भगिनीं नो, पत्रकार, tv वाहिनी वाले कृपया पूर्ण वाचा समजून घ्या आणि हा मुद्दा कृपया उचला।

भाजपा चे जेष्ठ नेते चिमूर विधानसभा क्षेत्रातील मिक्सर वाटप घटनेची गंभीर दखल घेणार का ? हे तर लोकशाही चे धिंडवडे !!!

16 ऑगस्ट शहिद दिन निमित्ताने चिमूर येथे भाजपा ने महिलांना रक्षाबंधन निमित्ताने मा मुख्यमंत्री च्या अर्धांगिनी च्या उपस्थिती त मिक्सर वाटण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला। प्रचंड गर्दी मुळे त्या दिवशी मिक्सर वाटले नाहीत। पण आता गावोगाव मिक्सर वाटणे सुरू आहे।
पण मित्रांनो यामागील मुद्दे समजून घेण्यालायक आहेत.
नाही निदान 60 हजार महिला चिमुरात कार्यक्रमात आल्या असतील। असा अधिकृत आकडा सांगतो. एकेकिला एक मिक्सर समजा दिला। (घरपोच, भाजप कार्यकर्ते बोलले तसे. 😀😃) नाही निदान कमीत कमी रुपये 1000 प्रति मिक्सर चे पकडले तर. 60000 गुणीला 1000 = 60000000 रुपये। सहा कोटी!!! वाढोना येथील झाडे साहेबांनी सांगितले बॉक्स वर 3000 रुपये लिहिले आहे। कंपनी मधून 1000 रुपयांचा पडला असेल असं गृहीत धरू. इतर गावोगावी गाड्या घोड्या पाठविल्या महिलांना आणण्यासाठी तो खर्च वेगळा। बॅनर पोस्टर होर्डिंग हा प्रचार वेगळा. समजा निवडणूक जिंकण्यासाठी इतका प्रचंड खर्च येतो मग सर्वसामान्य लोकांनी निवडणूक लढायची कशी ? ही लोकशाही सर्वसामान्य लोक निवडणूक लढू नये यासाठी आहे का ?
हा इतका पैसा येतो कुठून ? आपली व्यवस्था च अशी बनली आहे की कागदी बॅलन्स शीट वेगळ्या आणि छुपा व्यवहार वेगळा !!! कोणी राजकीय नेता छाती ठोक पणे सांगत असेल की मी भ्रष्टाचार केला नाही म्हणजे काय समजायचे ? आमदार खासदार निवडणूक साठी मिक्सर, साड्या, नोटबुक इत्यादी भेटवस्तू गावोगावी वाटतात असे नागरिकशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक मध्ये शिकवायला पाहिजे ना ? असे बदल अभ्यासक्रम मध्ये का करू नये ? आमदार खासदार कर्मचारी ऑफिसर जनसेवक असतात असे फक्त पुस्तक मध्ये शिकविण्या साठी च असते का? 100 टक्के लोक चोरी लबाडी भ्रष्टाचार करतात असे नाही। काही इमानदार व्यवस्थेत असतीलही हा भाग वेगळा। प्रामाणिकते आपण सदैव पाठीशी आहोत !!! पुस्तकात खर खर लिहायला पाहिजे।
work तिसरा मुद्दा...
काँग्रेस च्या काळात प्रत्येक भारतीय नागरिकांवर 80000/- कर्ज होते। भाजप सरकारने त्यांच्या पाच वर्षांच्या काळात अंदाजे 45000 रुपये दरडोई कर्ज अधिकचे घेतले. आता एकूण 125000 रुपये प्रत्येकावर सरकारने कर्ज घेऊन ठेवले आहे। भाजप, आर एस एस च्या माननीय नेत्यांनी पहिले व्यवस्था फिक्स करायला पाहिजे त्यानंतर लोन घ्यायला पाहिजे होते। कृपया माननीय आर एस एस च्या गंभीर नेत्यांनी ही नोंद घ्यावी।
1000 रुपयांचा जो काही मिक्सर भेट म्हणून मिळेल असेल तो ठेवून घ्यायचा। आणि उरलेल्या रकमेची मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांना करायला काय हरकत आहे? जर मिक्सर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणून दिला म्हणजे पक्ष त्यात आलाच !!! पक्षाची जबाबदारी आलीच !!! बरोबर की चूक ? या प्रश्नाचे उत्तर भाजपा वरिष्ठांनी जरूर द्यायला पाहिजे।
समजा पक्षवाल्यांची 1000/- ची वस्तू तुम्हांला भेट दिली। तर 45000/- कर्ज जे भाजप सरकारने दरडोई घेतले आहे, त्या मधून 1000 रुपये वजा करून बाकी 44000 रुपये सरकारला परत मागायला मिक्सर आणून देणाऱ्या मिक्सर घेणाऱ्या महिलेने भाजप कार्यकर्त्याला सांगायला काय हरकत आहे? कारण सरकार ने आपल्याला न विचारता आपल्या डोक्यावर इतके कर्ज वाढवून ठेवले आहे। उद्या हे कर्ज परत करायची वेळ आली तर हे राजकीय नेते, भ्रष्ट कर्मचारी वा ऑफिसर करणार आहेत का ? सर्वसामान्य जनतेच्या टाळूवरचे लोणीच काढतील ना ? मित्रा सर्वसामान्य माणसा, जागा हो रे बाबा !!!

गजेंद्र दि चाचरकर, M.E. Electronics
नवीन विचार, नवीन दिशा...जॉईन करा…


लोकशाही चे धिंडवडे

हजार दीड हजार रुपयांच्या मिक्सर साठी गरीब महिला तीनशे साडेतीनशे रुपयांची वन सोडून सभेला येते म्हणजे सर्वसामान्य लोकांना पै पै कमविण्या साठी किती प्रचंड त्रास होतो हे सिद्ध होते. फुकटचे मिळालेले क्षणिक आनंद देऊन जाते। फुकट चे मिळते तर कशाला सोडायचे ? यामुळे पण लोक गर्दीने जातात. हे सुद्धा नाकारता येत नाही. पण याचाच फायदा घेण्याचा राजकीय लबाड लोक घेत आहेत। यामागील मुद्दे लक्षात घ्या. फक्त श्रीमंत लोक च निवडणूक लढतील अशासाठी लोकशाही नाही। मिक्सर सारख्या वस्तू किंवा कोणत्याही वस्तू राजकीय नेत्यांनी प्रचंड प्रमाणात वाटणे।हे लोकशाही साठी खूप धोकादायक आहे. अशा घटनेची पक्षाच्या मोठ्या जेष्ठ नेत्यांनी गंभीरपणे नोंद घेणे आवश्यक आहे.
इतक्या प्रमाणात हजार तीन हजार चा मिक्सर वाटणे म्हणजे हा पैशाचा उन्माद आहे. आपल्या लोकशाही साठी, गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा आहे। गरीब सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळ आहे. याला चारपक बसायलाच पाहिजे।
असे घडण्याला आपण आपल्या नामदारांना किंवा एका व्यक्तीला दोषी पकडू शकतच नाही। ही पूर्ण लोकशाही यंत्रणा व्यवस्था च त्या दिशेने गेली आहे। न्याय आणि सत्याचा मर्डर झालेला आहे। आणि आपण सर्वसामान्य जनतेने आता गंभीरपणे मनावर घेऊन दुरुस्त करण्यासाठी ग्रामविश्व संघटनेच्या चळवळीला हातभार लावायला आहे.